शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य
पैठण, (प्रतिनिधी) : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा आणि समाजाभिमुख उपक्रमांमधील सक्रिय सहभाग याची दखल घेत शिक्षिका सौ. अर्चना वसंत गिरवलकर यांना यंदाचा प्रतिष्ठेचा "राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
हा मानाचा पुरस्कार छत्रपती संभाजीनगरचे माजी पालकमंत्री, तथा विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते एका भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला आहे. यावेळी पंचायत समिती सभापती वैशाली बोंबले, नगराध्यक्ष विद्या कावसानकर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच समितीचे अध्यक्ष डॉ. भरत झारगड, पंचायत समिती सदस्य दादासाहेब गलांडे, डॉ. सखु झारगड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
सौ. अर्चना गिरवलकर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले समर्पित कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले परिश्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केलेले योगदान यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षकवर्गातही अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, उपाध्यक्ष ज्योती ठाकूर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, विद्यासभा अध्यक्ष डॉ. जयंत जोशी, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. पद्मकुमार कासलीवाल, कार्यवाह जुगलकिशोर लोहिया, शिवाजी मारवाडी, नंदकिशोर मालाणी, डॉ. राम लोंढे, मनोज शुक्ल, विजय चाटुपळे, किशोर भाकरे, विजय पापडीवाल, रविंद्र साळजोशी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.











